मास्टर शेफची किमया; तप्त वाळवंटात अजब कुकिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेफ बुराक ओज्देमीर हे कुकिंगच्या भन्नाट संकल्पनांसाठी प्रसिद्ध आहेत. जगभरात त्यांचे असंख्य चाहते आहेत. त्यांची स्वतŠची रेस्टॉरंट चेन आहे. त्यांची कुकिंग शैली नेटीजन्सला आवडते. त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक व्हिडीओला लाखो लाईक्स आणि कमेंट्स मिळतात.

 सोशल मीडियावर रोजच अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. कधी कोणता व्हिडीओ चर्चेत येईल हे सांगता येत नाही. अनेकदा चर्चेत राहण्यासाठी काही लोक नवनवीन शक्कल लढवतात. आणि ती शक्कल सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ आहे प्रसिद्ध शेफ बुराक ओज्देमीर याचा. तप्त वाळवंटात शेफ बुराक फ्रायम्स तळताना दिसत आहेत. त्यासाठी त्याने भलीमोठी कढई घेतली. तापलेल्या वाळवंटावर ती कढई ठेवली.  त्याने कढईत तेल टाकून ते गरम केले. त्यानंतर उकळलेल्या तेळात फ्रायम्स तळले.

शेफ बुराक ओज्देमीर यांचा व्हिडियो तुफान व्हायरल होत आहे. शेफ बुराक यांनी हा व्हिडीओ 17 ऑक्टोबर रोजी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केला होता. काही दिवसांत 10 कोटींहून अधिक ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओ बघून नेटकऱयांच्या तोंडाला पाणी सुटल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. इन्स्टाग्रामवर शेफ बुराक यांचे 29.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.