
मुंबईत गोवरमुळे मृत्यू होण्याच्या संख्येत वाढ होत असून कुर्ला येथे राहणाऱया चार वर्षीय मुलीचा आज मृत्यू झाला. गोवर मुळे मृत्यू होण्याच्या संख्येत वाढ होत असून मुंबईत आतापर्यंत 15 मुलांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 15 पैकी तीन मुलांचे मृत्यू हे मुंबई बाहेरील आहेत. दरम्यान, आज दिवसभरात 46 नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या 4,839 वर पोहोचली आहे.
मुंबईत गोवरचा झपाटय़ाने प्रसार होत असून शहरात भायखळा, वरळी, वडाळा, धारावी, तर पश्चिम उपनगरात वांद्रे पूर्व , अंधेरी पूर्व, मालाड उत्तर, पूर्व उपनगरातील गोवंडी, चेंबूर, कुर्ला, भांडुप या भागात गोवरचा उद्रेक झाला आहे. मुंबईत दिवसभरात गोवरचे 46 संशयीत रुग्ण आढळले असून संशयित रुग्णांची संख्या 4,839 वर पोहोचली आहे.

























































