
मध्ये रेल्वेच्या मुख्य मार्गावर रविवारी ( 22.01.2023 रोजी) मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, मध्य रेल्वे ट्रान्सहार्बर आणि हार्बर मार्गावर देखभाल दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या ट्रान्सहार्बर मार्गावर रविवारी ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सकाळी 10.35 ते दुपारी 4.07 वाजेपर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या सर्व डाऊन मार्गावरील सेवा आणि वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सकाळी 10.25 ते दुपारी 4.09 वाजेपर्यंतच्या अप मार्गावरील सेवा रद्द असतील.
मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर लाईन सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोडवरून सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या सर्व डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते वांद्रे/गोरेगाव या मार्गावरील सर्व डाऊन मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
पनवेल/बेलापूर/वाशी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोडवरून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत आणि गोरेगाव /वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना रविवारी सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 पर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

























































