
सामना ऑनलाईन । जोधपूर
राजस्थानातील जोधपूरजवळ ओडाना या गावात हिंदुस्थानी हवाई दलाचे ‘मिग 27 यूपीजी’ हे लढाऊ विमान कोसळले. सुदैवाने विमानातील दोघा पायलटनी प्रसंगावधान राखून पॅराशूटच्या सहाय्याने विमान कोसळण्याच्या आधीच उडी घेतल्याने ते सुखरूप बचावले व या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही. सकाळी 11.45 वाजता ही दुर्घटना घडली.
सिरोहीच्या गोंडानामधील शिकगंज येथे रविवारी सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना झाली. उटारलाई हवाईदलाच्या बेसकरून या विमानाने उड्डाण घेतले होते, मात्र काही केळातच तांत्रिक बिघाड झाल्याने जोधपूरपासून 120 किलोमीटर अंतराकर विमान कोसळले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे कळताच विमानातील दोन्ही पायलटनी विमानातून उडय़ा मारल्यामुळे ते बचाकले. दरम्यान या घटनेची कोर्ट ऑफ इन्क्कायरीमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे हवाईदलाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वीही 8 मार्च रोजी बिकानेरमध्ये ‘मिग-21’ हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. त्यातूनही पायलट सुखरूप बचावले होते तर काही दिवसांपूर्वी जम्मू-कश्मीरच्या बडगाम येथेही हवाईदलाचे विमान कोसळले होते. त्यात दोन पायलट, चार जवान आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला होता.
























































