
इंडियन प्रीमियर लीग 2024च्या पुढील हंगामासाठी खेळाडूंच्या लिलावाची प्रक्रिया मंगळवारी पार पडली. या लिलावत सर्वाधिक बोली ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्क याला मिळाली आहे. त्याला 24.75 कोटी इतक्या रुपयांना कोलकाता नाईट रायडर्सने खरेदी केलं आहे. त्याखालोखाल पॅट कमिन्स या खेळाडूला बोली लागली असू सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. मिशेलला मिळालेली रक्कम ही आतापर्यंत सर्वाधिक आहे.
मिशेल स्टार्कची बेस प्राईस ही 2 कोटी होती. मिशेलला खरेदी करण्यासाठी आधी मुंबई आणि दिल्ली संघात चढाओढ सुरू असताना त्यात रक्कम वाढत गेल्याने कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्सने उडी मारली. या चढाओढीत कोलकाता संघाने बाजी मारली आणि मिशेलला 24.75 कोटींना खरेदी केलं.
दुसरी सर्वाधिक बोली लागलेल्या कमिन्सची बेस प्राईस 2 कोटी रुपये होती. त्याला खरेदी करण्यासाठी आरसीबी आणि सनरायझर्समध्ये चढाओढ लागली होती. यंदाच्या विश्वचषकानंतर पॅट कमिन्सला मागणी वाढणार हे उघड होतं. पॅट नंतर सॅम करन (18.50 कोटी), कॅमरून ग्रीन (17.50 कोटी), बेन स्टोक्स (16.25 कोटी) आणि निकोलस मॉरिस (16.25 कोटी) आणि निकोलस पूरन (16 कोटी) अशी सर्वाधिक बोली लागलेल्या खेळाडूंची नावं आहेत.
हिंदुस्थानी खेळाडूंमध्ये युवराज सिंग याला सर्वाधिक बोली लागली. युवराज सिंग (16 कोटी), ईशान किशन (15.25 कोटी), गौतम गंभीर (14.90 कोटी), दीपक चाहर (14 कोटी), दिनेश कार्तिक (12.50 कोटी) हे सर्वाधिक बोली लागलेले हिंदुस्थानी खेळाडू आहेत.


























































