
सामना प्रतिनिधे । श्रीगोंदा
श्रीगोंदा नगर तालूक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार तथा कूकडी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांच्या कारखान्याने अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे सुमारे सात कोटी रूपयांचे कर्ज थकवल्याने कारखान्याचे लाखो टन साखर असलेले सहा गोडाऊनच्या चाक्या बँकेच्या आधिकार्यांना पैसे वसूलीसाठी ताब्यात घेतल्याने तालूक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
श्रीगोंदा तलूक्यातील मौजे पिपंळगाव पिसा येथील कूकडी सहकारी साखार कारखानेने अहमदनगर जिल्हा सहकारी बँक शाखा पिपंळगाव पिसा येथील सुमारे सात कोटी रूपयांची कर्ज थकवल्याने बँकेचे शाखा आधिकारी पोपट व्यवहारे यांनी वेळोवेळी वसूलीसाठी पत्रव्यवहार करूनही थकबाकी न दिल्याने सोमवारी नाईलजावास्तव लाखो टन साखर असणारे गोडाऊन वरिष्ठ आधिकार्यांसह गोडवानाच्या चाव्या ताब्यात घेतल्या.
स्व. कुडलीकराव जगताप यांनी अथक परिश्रम घेऊन कूकडी कारखाना उभा केला. तात्या असताना कामागारासह कूणाचे ही पैसे न थकवाता कायम ‘अ’वर्ग दर्जा सांभाळाला. स्वतः आमदार होता आले नाही पण आमदारचा वडील झालेचे कौतुक त्यांना होते. परंतु तात्या जाऊन एक वर्ष पूर्ण होते ना होते तोच कारखान्याचे सहा साखर गोडाऊनच्या चाव्या ताब्यात घेतल्याने तालूक्यात ऊस ऊत्पादकासह शहरात खळबळ ऊडाली आहे
आमदार कूकडीचे अध्यक्ष जगताप यांनी ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी २३०० देण्याचे जाहिर केले परंतु आनेक शेतकऱ्यांना प्रति टन ५०० रुपये देणे आहे तर. कारखान्यातील हजारो कामगारांना अनेक महिन्यांपासून पगार नाहीत. यामूळे आमदार अडचणीत की कारखाना अडचणीत? अशी शेतकरी वर्गात चर्चा आहे.























































