‘ट्राय’ची नवीन नियमावली, मोबाईल पोर्टिंगची पद्धत बदलणार

1019

मोबाईल नंबर तोच, पण सेवा देणारी कंपनी बदलण्यासाठी कराव्या लागणाऱ्या पोर्टिंगसाठी आता पद्धत बदलणार आहे. त्यासाठी येत्या सोमवारपासून ‘ट्राय’ या टेलिकॉम नियामक संस्थेने नवी नियमावली लागू करायचे ठरविले आहे. नव्या नियमांनुसार एकाच विभागातील मोबाईल पोर्टिंग केवळ तीन दिवसांत होणार असून दुसऱ्या विभागात पोर्टिंग हवे असेल तर पाच दिवसांत होईल असेही ‘ट्राय’ने म्हटले आहे.

यापुढे मोबाईल पोर्टेबिलिटीसाठी युनिक पोर्टिंग कोड जनरेट झाल्यावरच युजर नंबर पोर्ट होऊ शकेल. नव्या नियमांनुसार पोस्ट पेड मोबाईल क्रमांक पोर्ट करायचा असल्यास ग्राहकाला आधीचे बाकी रुपये भरणा केल्यावरच दुसऱ्या सेवा प्रदाता कंपनीत नंबर पोर्ट करता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या