
कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्यात आली आहे, अशी घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली. परंतु ही घोषणा फसवी निघाली असून अशा पद्धतीची कुठलीही कांदा निर्यात बंदी उठवली नाही, अशी माहिती केंद्रीय सचिव रोहित कुमार सिंह यांनी मंगळवारी बोलताना दिली. त्यामुळे मोदी सरकारने शेतकयांची घोर फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कांदा निर्यातबंदी उठवली असताना आज सकाळी कांद्याच्या किंमतीत वाढ पाहायला मिळाली. यानंतर कांदा निर्यात बंदी ही 31 मार्चपर्यंत कायम राहील, असे केंद्रीय सचिव रोहित कुमार सिंह यांनी स्पष्ट केले.

























































