मोहनबुवा रामदासी यांना रवींद्र भट स्मृती पुरस्कार

59

सामना ऑनलाईन । पुणे

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे रवींद्र भट यांच्या स्मरणार्थ दरवर्षी संतसाहित्य क्षेत्रातील लक्षणीय योगदानाबद्दल दिला जाणारा पुरस्कार यंदा मोहनबुवा रामदासी यांना जाहीर करण्यात आला. तसेच डॉ. म. वि. गोखलेपुरस्कृत प्राचार्य शं. वा. तथा सोनोपंत दांडेकर स्मृती पुरस्कार, तत्वज्ञान / नीती/ अध्यात्मक/ मानसशास्रीयविषयक ग्रथांला दिला जातो.

हा पुरस्कार मानवी स्वभावाचे त्रिगुणात्मक विश्लेषण या ग्रंथासाठी डॉ. श्रीपाद जोशी (इंदोर) यांना दिला जाणार आहे.
7 हजार 500 आणि सन्मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. अभय टिळक यांच्या हस्ते आणि मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्याक्षतेखाली हा पुरस्कार प्रदान समारंभ होईल.सोमवारी ता 22 सायंकाळी 6.30 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन साभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या