
‘नफरत के इस बाजार में मुहब्बत की दुकान खोलने आया हूं’… राहुल गांधींनी त्यांच्या यात्रेत केलेले हे विधान देशात चांगलेच लोकप्रिय झाले आहे. त्यांच्या या विधानामुळे प्रभावित झालेल्या एका हँडलूम दुकानदाराने आपल्या दुकानाबाहेर राहुल गांधींच्या फोटोसोबत ‘मोहब्बत की दुकान’ नामक बोर्ड लावला आहे. आता या दुकानाचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.
दुकानदार म्हणाला – कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही
दुकानदार मोनूने सांगितले की, त्याचे गोहाना रोडवर अनेक वर्षांपासून टेक्सटाइल व हँडलूमच्या वस्तूंचे दुकान आहे. पण राहुल गांधी यांनी आपल्या यात्रेत अलवरमध्ये आपण द्वेषाच्या या बाजारात प्रेमाचे दुकान उघडण्यासाठी आल्याचे भावूक विधान केले. त्यानंतर पानिपतमध्येही त्यांनी त्याचा पुनरुच्चार केला. त्याचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला.
बोर्ड पाहून लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटते
दुकानाच्या बाहेर लावलेला हा बोर्ड ये-जा करणारे लोक पाहतात. ते पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटते. त्यानंतर ते व्यक्ती माझ्याकडे पाहूनही हसतात. याच हसण्याचे नाव मोहब्बत की दुकान आहे. या 3 शब्दांचा अर्थ खूप खोल आहे. बोर्ड पाहिल्यानंतर व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य येते. सध्याच्या धावपळीच्या युगात आपण हेच हास्य विसरलो आहोत.
























































