उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचा हाहाकार, 24 तासात आढळले 37 हजारहून अधिक रुग्ण

देशात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. अशात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. गेल्या 24 तासात उत्तर प्रदेशमध्ये 37 हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तसेच 150 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासात उत्तर प्रदेशमध्ये 37 हजार 238 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळ राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 10 लाखांच्या वर गेली आहे. सध्या राज्यात 2 लाख 73 हजार 653 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात उत्तर प्रदेशमध्ये 196 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे राज्यातील एकूण मृतांचा आकडा 10 हजार 737 वर पोहोचला आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णालयात बेड्सचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. राजधानी लखनौमध्ये सर्व रुग्णालय रुग्णांनी भरले असून बेड्स, ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा आहे. बेड्स नसल्याने रुग्णालयांनी अतिरिक्त खाटा टाकून रुग्णसेवा सुरू ठेवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या