महाराष्ट्रात सर्वाधिक दारू तर गुजरातमध्ये सर्वाधिक अंमली पदार्थ जप्त, निवडणूक आयोगाची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आचारसंहिता लागल्यापासून  देशाच्या वेगवेगळ्या भागात छापे मारून दीद हजार कोटी हून अदिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रसिद्धी पत्रकाद्वारे निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे. या जप्तीच्या कारवाईत सर्वाधिक रोख रक्कम आणि सोने तमिळनाडूत, सर्वाधिक दारू महाराष्ट्रात तर सर्वाधिक अंमली पदार्थ गुजरातमध्ये पकडण्यात आली आहे.

छापेमारीत एकूण 356 रुपयांची रोख रक्कम, 300 कोटी रुपयांचे सोने चांदी आणि 696 कोटी रुपयांचे अमली पदार्थ आणि 150 कोटी रुपयांची दारू पकडण्या आली आहे. सर्वाधिक किंमतीचा मुद्देमाल गुजरात, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये पकडण्यात आला आहे.  देशात सर्वाधिक प्रमाणात दारू महाराष्ट्रात पकडण्यात आली आहे.

तमिळनाडूमध्ये 121 कोटी रुपयांची रोख रक्कम पकडली असून, त्याखालोखाल आंध्र प्रदेशमध्ये 95 कोटी रुपये व उत्तर प्रदेशमध्ये 22 कोटींची रोख रक्कम पकडण्यात आली आहे.

महाराष्ट्रात एकूण 18 कोटी 37 लाख लिटर दारू पकडण्यात आली आहे, तर गुजरातमध्ये सर्वाधिक किंमतीचे अंमली पदार्थ पकडण्यात आले आहे. गुजरातमध्ये 100 किलो अंमली पदार्थ पकडली असून त्यांची किंमत तब्बल 500 कोटी इतकी

आहे. गुजरातमध्येच सर्वाधिक संपत्ती म्हणजेच 510 कोटी रुपयांची संपत्ती पकडण्यात आली आहे. तमिळनाडूमध्ये सर्वाधिक सोने पकडण्यात आले त्याची किंमत तब्बल 135 कोटी इतकी आहे. तर आंध्र प्रदेशमध्ये सर्वाधिक मोफत वाटण्याच्या वस्तू पकडण्यात आल्या आहेत त्यांची किंमत 10 कोटी 83 लाख इतकी आहे.