
Motorola कंपनीने आपला नवीन बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Moto E30 असे या स्मार्टफोनचे नाव असून यात होल पंच डिल्स्पे डिझाईन, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि 5000 एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.
वैशिष्ट्य –
– डुअल-सिम (नॅनो)
– 6.5 इंचाचा एचडी+ (720×1600 पिक्सल) मॅक्स व्हिजन आयपीएस डिस्प्ले
– ऑक्टा-कोर यूनिसॉक T700 प्रोसेसर
– 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज

कॅमेरा –
Moto E30 मध्ये कंपनीने ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहे. सेल्फीसाठी यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही यात आहे.

इतर फिचर्स –
फोनमध्ये 4G एलटीई, ब्लूटूथ व्हर्जन 5, वाय-फाय 802.11 ए/बी/जी/एन, जीपीएस, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 मिलीमीटर हेडफोन जॅक यात देण्यात आले आहे. सुरक्षेसाठी फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आले आहे.

किंमत –
Moto E30 हा फोन 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजसह उपलब्ध असून याची किंमत जवळपास 10 हजार 200 रुपये आहे.

























































