
मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात अपघातांची मालिका सुरूच आहे. भरधाव कंटेनरने तीन वाहनाना धडक देऊन झालेल्या अपघाताचे वृत्त ताजे असतानाच आज भोस्ते घाटात ओली मासळी वाहून नेणाऱ्या कनेरनरला भीषण अपघात झाला. घाट उतरताना ब्रेक निकामी झाल्याने कंटेनर विरुद्ध दिशेला जाऊन शेतात पलटी झाला. या अपघतात चालक तरुकच्या केबिनखाली अडकून पडला तर क्लिनर बाहेर फेकला गेल्याने बचावला. हा अपघातात रात्री 8 वाजण्याच्या सुरमारास घडला.
गुजरात राज्यातील वेरावळ ट्रान्सपोर्ट कंपनीचा कंटेनर ताजी मासळी (बांगड्याचे क्रेट) घेऊन गोव्याकडून मुंबईकडे चालला होता. महामागावरील भोस्ते घाटात उतरत असताना ब्रेक अचानक निकामी झाले आणि चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित कंटेनगर शेतात पलटी झाला. अपघात झाला तेव्हा झालेल्या मोठ्या आवाजाने आजूबाजूच्या नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. केबिनमध्ये पाय अडकून बसलेला चालक मदतीसाठी याचना करत होता. वेदना असह्य झाल्याने त्याची तडफड सुरु होती, मात्र क्रेन शिवाय त्याला बाहेर काढणे शक्य नव्हते. अपघात झाला तेव्हा काळोख असल्याने मांडतात कार्यात अनेक अडचणी येत होत्या.


























































