
ऑनलाइन वाईन खरेदीच्या नावाखाली म्युझिशियनला चुना लावल्याची घटना गोरेगावात घडली. ऑनलाइन फसवणूक प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार हे म्युझिशियन असून ते गोरेगाव परिसरात राहतात. गेल्या आठवड्यात तक्रारदारांनी ऑनलाइन वाईनसाठी इंटरनेटवर नंबर शोधला. तेव्हा त्याना सर्च इंजिनमध्ये एक नंबर दिसला. त्या नंबरवर तक्रारदारांनी फोन करून तीन बिअरची ऑर्डर दिली. तीन बिअरचे 540 रुपये झाल्याचे तक्रारदारांना सांगण्यात आले. त्यानंतर तक्रारदारांनी पेटीएम वरून बिल पाठवण्यास सांगितले. बिल पाठवल्यावर फोन करणाऱ्या व्यक्तीने तक्रारदारांना पुन्हा फोन केला. तुमचे बिल तयार होत नसून एक बारकोड पाठवत असून तो बारकोड फक्त स्कॅन करण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदारांनी तो बारकोड स्कॅन केल्यावर त्यांच्या खात्यातून सुरुवातीला 39 हजार 991 रुपये काढल्याचे उघड झाले.































































