Video- बुटक्याला आईवरून शिवी दिली,लोकलमधून उतरून कुदवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची भांडणे हा काही नवीन विषय नाही. लहानसहान गोष्टींवरून प्रवाशांमध्ये वाद होतात आणि वादाचे रुपांतर हाणामारीत होते. लोकल ट्रेन प्लॅटफॉर्मवर उभी असताना झालेल्या एका मारामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ताडमाड उंच अशा प्रवाशाची उंचीने कमी असलेल्याने धुलाई केली. उंच प्रवाशाने उंचीने कमी असलेल्या प्रवाशाबद्दल वाईट शब्द वापरले होते आणि त्याला आईवरून शिवी दिली होती. ही शिवी दिल्यानंतर उंचीने कमी असलेल्या व्यक्तीने लोकलमधून उतरत या प्रवाशाची गचांडी धरली आणि त्याला धडा शिकवला.

हा व्हिडीओ मुंबईतला असून ट्रेनमधून उतरत असताना या दोन प्रवाशांमध्ये काही कारणावरून वाद झाला. प्लटफॉर्मवर उभ्या असलेल्या माणसाची उंची जास्त होती आणि लोकलच्या दारात उभ्या असलेल्या व्यक्तींची उंची तुलनेने कमी होती. प्लॅटणॉर्मवरील माणसाने कमी उंचीच्या माणसाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली तेव्हा तो स्वत:वर काहीसा ताबा ठेवून होता मात्र जेव्हा त्याला आईवरून शिवी घातली तेव्हा त्याचा संयम सुटला आणि त्याने उच माणसाची गचांडी धरली आणि त्याने एकापाठोपाठ एक फाईट मारायला सुरुवात केली. बुक्क्यांच्या मारापुढे उंच माणूस बेजार झाला होता.