पालिका शाळांतील शिक्षकांची 800 रिक्त पदे भरणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

पालिका शाळांमध्ये रिक्त असणारी शिक्षकांची 800 पदे भरली जाणार आहेत. ही भरती तासिका तत्त्वावर केली जाणार आहे. याबाबत कार्यवाही सुरू झाली असल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली. पालिकेच्या शाळांच्या दर्जा सुधारण्यासाठी अनेक अत्याधुनिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामुळे पालिका शाळांचा दर्जा चांगलाच उंचावला आहे. मात्र शिक्षकांची तब्बल 800 पदे रिक्त असल्याने उपलब्ध शिक्षकांवर ताण वाढत होता. शिवाय पालिका शाळांत या वर्षी विद्यार्थीसंख्या वाढवण्यासाठी एप्रिलपासून राबविण्यात आलेल्या ‘मिशन अॅडमिशन’ मोहिमेत यंदा एक लाख दोन हजार मुलांनी प्रवेश घेतला आहे. गेल्या वर्षी 29 हजार विद्यार्थी वाढले होते. त्यामुळेच शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात येत आहेत.