
गोरेगावच्या नेस्को संकुलात आयोजित म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या अतिसेवनाने दोन विद्यार्थ्यांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी जामिनासाठी हायकोर्टात धाव घेणाऱ्या नेस्कोच्या दोन अधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज दिलासा दिला. न्यायमूर्ती शाम चांडक यांच्या एकलपीठाने आरोपी बाळकृष्ण कुरूप व सनी जैन यांची एक लाखाच्या जातमुचलक्यावर सुटका केली. ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे नेस्को कंपाऊंडमधील म्युझिक कन्सर्टच्या कार्यक्रमात झालेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी अटकेत असलेले नेस्को लाईव्ह इव्हेंट्सचे उपाध्यक्ष बाळकृष्ण कुरूप आणि व्यवस्थापक सनी जैन यांनी हायकोर्टात धाव घेत जामिनासाठी अर्ज दाखल केला. या याचिकेवर न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या एकलपीठासमोर सुनावणी पूर्ण झाल्याने न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.

























































