
तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कोलकाता येथील निवासस्थानी शनिवारी सकाळी पोलिसांच्या एका पथकाने अचानक छापा टाकला. अभिषेक बॅनर्जी यांचे वैयक्तिक सहाय्यक सुमित रॉय यांच्या शोधासाठी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईदरम्यान बॅनर्जी यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शालबोनी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कोलकाता पोलिसांच्या संयुक्त पथकाने पहाटेच ही शोधमोहीम सुरू केली. सुमित रॉय यांनी निवडणुकांमध्ये पक्षाचे तिकीट मिळवून देण्याच्या बदल्यात काही व्यक्तींकडून मोठी रक्कम स्वीकारल्याचा आरोप आहे. या कथित गैरव्यवहार प्रकरणाचा तपास पोलीस करत असून, रॉय यांचा शोध घेण्यासाठी हा छापा टाकण्यात आला.
STORY | West Bengal: Police raid Abhishek’s Kolkata residence for over 4 hours
In a dramatic pre-dawn operation that triggered a political storm in West Bengal, a large contingent of police, accompanied by central forces, raided the Kalighat residence of TMC national general… https://t.co/QLb1cgQs5d
— Press Trust of India (@PTI_News) June 13, 2026
पोलिसांनी केलेल्या छापेमारीची माहिती मिळताच पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांनी तात्काळ अभिषेक बॅनर्जी यांच्या निवासस्थानी धाव घेतली आणि परिस्थितीचा आढावा केली. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर अद्याप अभिषेक बॅनर्जी किंवा त्यांच्या कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
सीआयडीकडून समन्स
दरम्यान, या छाप्याच्या अवघ्या एक दिवस आधी राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने अभिषेक बॅनर्जी यांना समन्स बजावले होते. निवडणूक प्रचारादरम्यान कथित प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांना 16 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शुक्रवारी दुपारी सीआयडीचे पथक नोटीस देण्यासाठी अभिषेक यांच्या घरी गेले होते, परंतु ते त्यावेळी घरात नव्हते. ते जवळच असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी बैठकीसाठी गेले होते. अखेर दोन तास वाट पाहिल्यानंतर, सीआयडी अधिकाऱ्यांनी ही नोटीस त्यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याकडे सुपूर्द केली. हे प्रकरण सुरुवातीला बगुइआटी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्यानंतर ते बिधाननगर सायबर गुन्हे शाखेकडे आणि आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आले आहे.
पश्चिम बंगालमध्ये चार हजार ईव्हीएम खाक, घोटाळ्याचे पुरावे नष्ट केल्याचा संशय
मदन मित्रा यांच्यावर ईडीचे छापे
एकीकडे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर पोलिसांचा दबाव वाढत असतानाच शनिवारी अंमलबजावणी संचालनालयाने टीएमसीचे आमदार मदन मित्रा यांच्यावर मोठी कारवाई केली. कथित महानगरपालिका भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीने मित्रा यांच्याशी संबंधित 8 विविध ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईमुळे तृणमूल काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.




























































