पश्चिम बंगालमध्ये चार हजार ईव्हीएम खाक, घोटाळ्याचे पुरावे नष्ट केल्याचा संशय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आलेले 4 हजार ईव्हीएम आगीमध्ये जळून खाक झाली आहेत. कोलकातामधील एका सरकारी इमारतीत ही ईव्हीएम ठेवण्यात आली होती. या घटनेनंतर तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि ‘आप’ने संशय व्यक्त केला असून, निवडणुकीत झालेल्या मतघोटाळ्याचे पुरावे नष्ट केल्याचा आरोप होत आहे.

दक्षिण कोलकाता येथील अलीपूर भागातील नऊ मजली सरकारी इमारतीत ही ईव्हीएम ठेवण्यात आली होती. ही मशीन्स पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत 10 विधानसभा मतदारसंघांमध्ये वापरण्यात आली होती. हे सर्व ईव्हीएम जळून खाक झाले आहेत. इमारतीत दक्षिण 24 परगणा जिल्हा परिषदेसह इतर सरकारी कार्यालयेदेखील होती. आग लागल्यानंतर 24 तासांनंतरही अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवता आले नव्हते. आगीच्या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. इमारत पूर्णपणे सील करण्यात आली असून फॉरेन्सिक तपास सुरू करण्यात आला आहे.

तृणमूलसह काँग्रेस, ‘आप’चा आरोप

4 हजार कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्रे जळून खाक झाली आहेत. गूढरीत्या ईव्हीएम नष्ट झाले आहेत, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. तर आगीबद्दल मोदी सरकार, भाजप आणि निवडणूक आयोगाने उत्तर द्यावे, अशी मागणी काँग्रेस आणि ‘आप’ने केली आहे. विशेष म्हणजे, पश्चिम बंगाल सरकारचे मंत्री काwशिक चौधरी यांनीही आगीच्या घटनेत घातपात वाटत असल्याचे म्हटले आहे.

आग दुसऱ्या मजल्यावरून थेट नवव्या मजल्यावर!

या आगीवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीत वापरण्यात आलेले ईव्हीएम नवव्या मजल्यावर होते. आग दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर लागली. मधल्या कुठल्याही मजल्यांना धोका न पोहोचता आग थेट नवव्या आणि दहाव्या मजल्यांवर कशी पोहोचली, असा संशय मंत्री कौशिक चौधरी यांनीच व्यक्त केला.