
साठ वर्षांच्या आजोबांना मॅट्रीमोनी साईटवर बायको शोधणे चांगलेच महागात पडले आहे. आजोबांनी मॅट्रीमोनी साईवर बायको शोधायला लागले. तिथे एका तरुणीशी त्यांची ओळख झाली. दोघांनी एकमेकांचे नंबर शेअर केले आणि त्यांच्यात चॅटिंग सुरु झालीय. सुरुवातीला फोनवर बोलणे होऊ लागले आणि त्यानंतर व्हिडीओ कॉल सुरु झाले. मात्र त्यानंतर असे काही झाले त्याने आजोबांच्या पायाखालची जमिनच सरकली.
मुंबईतील ही घटना आहे. 60 वर्षांचे एक आजोबा एकटेपणाला कंटाळले होते. त्यामुळे ते लग्न करु इच्छित होते. त्यांनी त्यासाठी मॅट्रिमोनी साईटची मदत घेतली. तिथे त्यांनी रजिस्ट्रेशन केले. त्यांच्या प्रपोजलला एका तरुणीने अॅक्सेप्ट केले. ती तरुणी त्यांच्यासोबत लग्न करण्यास तयार होती. तरुणीने त्यांना आपला नंबर दिला. त्यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरु झाले. लग्नाबाबत प्लॅनिंग सुरु झालीय. बोलणं वाढत गेलं आणि व्हिडीओ चॅटपर्यंत पोहोचले. मात्र त्या आजोबांना पुढे काय वाढून ठेवले याची पुसटशी कल्पनाही नव्हती. व्हिडीओ कॉल दरम्यान तरुणीने आपले कपडे उतरवले आणि आजोबांना उत्तेजित करत त्यांनाही कपडे काढायला भाग पाडले. त्यानंतर जे घडले ते भयंकर होते.
दोन दिवसांनी तरुणीने त्या आजोबांना फोन केला. आणि सांगितले की, त्यांची अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. त्यादिवशी दोघांनी कपडे उतरवले ते सगळे रेकॉर्डेड आहे. त्य़ानंतर तरुणीने त्या आजोबांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि मोबदल्यात पैसे मागितले. तरुणीने पैसे न दिल्यास तो व्हिडीओ सोशल साईट्सवर शेअर करण्यात येईल. शरमेने त्या आजोबांनी तिला काही पैसे दिले. मात्र त्यावर ती थांबली नाही. तरुणी वारंवार पैसे मागू लागली. आपली लाज वाचविण्यासाठी ते आजोबा पैसे देत होते.
आजोबांनी या तरुणीच्या खात्यात साठ लाख रुपये ट्रान्सफर केले. मात्र तरीही तिचा लालचीपणा कमी झालेला नव्हता. मात्र अखेर वैतागलेल्या आजोबांनी तिची पोलिसात जाऊन तक्रार केली. पोलिसांनी सायबर सेलकडे ही तक्रार नोंदवली. पोलिसांनी महिलेचा व्हॉट्सअप नंहबर आणि खाते क्रमांक घेतला आहे. ज्यातून पैसे ट्रान्सफर झाले आहेत. पोलीस तपास करत आहे की ही महिला एकटीच हे काम करत होती की यामागे सेक्टॉर्शन आहे.




























































