अर्नाळा समुद्रातून झेप घेत जंजिरे किल्ल्यावर छत्रपतींना मानाचा मुजरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | वसई

अर्नाळाचा किल्ले जंजिरा..  तिथीनुसार या किल्ल्याने बुधवारी 282 वर्षे पूर्ण केली… योगायोगाने शिवछत्रपतींचा राज्याभिषेकही तारखेनुसार त्याचदिवशी… दुग्धशर्करा योग जुळून आल्याने एका दुर्गमित्राने थेट अर्नाळा समुद्रात उडी मारून सवा तासात किल्ले जंजिरा गाठले. इतकेच नव्हेतर अर्नाळा जंजिराच्या बुरुजावर चढून भगवा झेंडा फडकवत शिवरायांना मानवंदना दिली.  मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले निनाद पाटील असे या दुर्गमित्राचे नाव आहे. ते अर्नाळा येथील रहिवासी असून महाराष्ट्राचे गृहविभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांचे अंगरक्षक आहेत. पाटील हे मी जागृत बंदरपाडेकर या संस्थेचे सदस्य असून ते समुद्रकिनारे स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवत असतात.