
नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट शाईचा पुरवठा करणाऱ्या दोघांचा गोरखधंदा आर्थिक गुन्हे नियंत्रण शाखेच्या पथकाने उद्धवस्त केला. पोलिसांनी अँटॉप हिल येथील एका खोलीमध्ये छापा टाकून सुमारे 23 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. अटक आरोपी नामांकित कंपनीच्या नावाने बनावट शाई स्टेशनरी, अन्य दुकाने आणि कार्यालयांना पुरवत होते. नामांकित कंपन्यांच्या नावाने बाजारात बोगस शाईच्या बाटल्या विकल्या जात असल्याची माहिती गुन्हे नियंत्रण शाखेला मिळाली. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील तसेच गणेश डोईफो़डे, चंद्रकांत वलेकर, महेश कोळी, विशाल यादव, दरेकर व पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे अॅण्टॉप हिलच्या कोकरी आगार परिसरातील एका खोलीमध्ये छापा टाकला. तेव्हा तेथे दोन तरुण नामांकीत कंपन्यांचे लेबल लावलेल्या बाटल्यांमध्ये बनावट शाई भरत असताना रंगेहात सापडले. पोलिसांनी नारायण वाविया आणि राहुल देवाजी सांडा या दोघांना ताब्यात घेऊन जवळपास 23 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.























































