बिनमिशीचे दाढीवाले मुसलमान खतरनाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, लखनौ

बिनमिशीचे दाढीवाले मुसलमान कट्टर आणि खतरनाकही असतात. ते दिसायलाही खूप भयानक दिसतात, असे उत्तर प्रदेश शिया वफ्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी म्हटले आहे. याबाबतचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. इस्लाममध्ये दाढी ठेवण्याची परंपरा आहे. मात्र, मिशीशिवाय दाढी ठेवणाऱ्या मुसलमानांकडे दहशतवादाचा चेहरा म्हणून पाहिले जाते. लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठीच ते असे राहतात असे रिजवी यांनी सांगितले.

असे मुसलमान इतरांच्या आयुष्यात हस्तक्षेप करतात. तसेच शरियतशी संबंध नसलेले फतवे जारी करतात. फतवे जारी करणाऱ्या मौलानांविरोधात मानहानीचा खटला दाखल करावा, असे आवाहन त्यांनी सरकारला केले आहे. संविधानाशिवाय इतर कायदे या देशात असू शकत नाहीत. त्यामुळे अशा मौलवींविरोधात खटला दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. इसिसच्या झेंड्याखाली हिंदुस्थानात जिहाद पसरवण्याचे स्वप्न काही मुसलमान बघत आहेत. या मार्गाने हिंदुस्थानात कट्टरपंथी हुकूमशाही स्थापन करता येईल, असे त्यांना वाटते. त्यांच्यामुळे देशात दहशतवाद वाढत असल्याचा आरोपही रिजवी यांनी केला. रिजवी यांनी याआधीही मदरशातील शिक्षण बंद करून तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची मागणी केली होती.