
सामना प्रतिनिधी । नगर
नगरमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीनही पक्षांनी महापौरपदासाठी उमेदवार दिले होते. मात्र भाजप-राष्ट्रवादी यांचे नगरसेवक महानगरपालिकेमध्ये एकत्र दाखल झाले. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजप-राष्ट्रवादी सोबत गेले हे उघड झाले होते. त्यातच ऐनवेळी राष्ट्रवादीचे महापौर पदाचे उमेदवार संपत बावसकर यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे लढत थेट शिवसेना भाजपमध्ये होती.
निवडणूक सुरू झाली तेव्हा मतदानाच्या प्रक्रियेवर शिवसेनेने आक्षेप घेत बहिष्कार टाकला. पण शिवद्रोही छिंदमने शिवसेनेला मत देतो म्हणून हात वर केला. त्यावेळी शिवसेना नगरसेवक संतापले आणि आम्हाला तुझे मत नको असे म्हणत त्याला सभागृहातच चोप दिला. भाजपा व राष्ट्रवादीच्या सांगण्यावरून छिंदमने सेनेला मतदान केले आमचे ते मत नाही असे शिवसेनेच्या वतीने योगिराज गाडे यांनी स्पष्ट केले. तसेच आपण निवडणुकीच्या आधीच छिंदमचे मत शिवसेनेला पडल्यास ग्राह्य धरू नये अशी विनंती प्रशासनाला केली होती असे स्पष्ट सांगितले.

LIVE अपडेट
- शिवसेनेच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकून प्रसार माध्यमांशी संवाद साधला
- काँग्रेसच्या उपमहापौरपदाच्या रूपाली वारे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला
- भाजपा व राष्ट्रवादीच्या सांगण्यावरून छिंदमने सेनेला मतदान केले आमचे ते मत नाही- योगिराज गाडे
- भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौर, वाकळे यांना 37 मतं
- शिवसेनेने महापौर निवडणुकीवर बहिष्कार टाकला
- श्रीपाद छिंदमने भाजप-राष्ट्रवादी ऐवजी मुद्दाम शिवसेनेला मत दिले, शिवसेना नगरसेवकांनी छिंदमला सभागृहातच चोप दिला
- श्रीपाद छिंदमचे मत शिवसेनेला मिळाल्यास ग्राह्य धरू नये!
- शिवद्रोही श्रीपाद छिंदम देखील उपस्थित, महापालिका आवारात प्रचंड पोलीस बंदोबस्त
- उपमहापौर पदाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपत बावसकर यांचा उमेदवारी अर्ज मागे
- काँग्रेसने महापौर निवणुकीवर बहिष्कार टाकला आहे. जातीयवादी पक्षाबरोबर जाणार नाही, असे काँग्रसच्या रुपाली वारे यांनी सांगितले.
- जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित राहणार
- शिवसेनेकडून बाळासाहेब बोराटे तर उपमहापौर पदासाठी गणेश कवडे यांचा अर्ज
- भाजपाकडून बाबासाहेब वाकळे यांचा महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज
- उपमहापौरपदासाठी भाजपाच्या मालन ढोणे यांचा उमेदवारी अर्ज

























































