मुलं पळवणारी असल्याचा संशय, महिलेला जमावाने बेदम चोपले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नागपूर

महाराष्ट्रामध्ये सध्या ‘मुले पळवणारी टोळी आली’ अशा अफवा पसरवणारे मेसेज व्हायरल होत असून याच अफवेतून धुळ्यामध्ये पाच जणांना हकनाक जीव गमवाला लागला होता. आता या अफवांचे लोण राज्याची उपराजधानी नागपूरपर्यंत पोहोचले आहे. गुरुवारी नागपुरात मुलं पळवणारी समजून एका महिलेला १५० ते २०० लोकांच्या जमावाने घेरले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. परंतु काही अघटीत घडण्यापूर्वीच पोलिसांनी या जमावाच्या तावडीतून महिलेला सोडवले. पोलीस पुढील तपास करत आहेत.

नागपुरातील पारशिवनी गावामध्ये एक महिला औषध विकण्यासाठी आली होती. परंतु गावातील लोकांनी तिला मुलं पळवणारी समजून पकडले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती काही लोकांनी पोलिसांनी दिली. राज्यात इतर ठिकाणीही अशा घटनेतून जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्याने पोलिसानी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि महिलेला जमावाच्या तावडीतून सोडवले.

अफवा रोखण्यासाठी व्हॉटस्अॅप आणणार नवीन फिचर

मालेगावात महिलांसह चौघांना मारहाण, पोलिसांवरही जमावाचा हल्ला

धुळय़ात मुले पळवण्याच्या अफवेचे बळी, पाचजणांची दगडाने ठेचून हत्या

सोशल मीडियाच्या माध्यमातून या अफवा पसरवणाऱ्यांवर जबर बसवण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू असून नागरिकांना कोणत्याही अफवांना शहानिशा न करता विश्वास ठेऊ नका असे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी मुलं चोरणारे चोरटे समजून पंढरपूरचे माजी नगरसेवक नंदकुमार डोंबे यांच्यासह अन्य दोन जणांना नंदूरबार जिल्ह्यात बेदम मारहाण करण्यात आली होती, तसेच औसा तालूक्यातील हलगरा येथे अफवेवर विश्वास ठेऊन रिक्षाचालकास मारहाण केली होती व रिक्षाही जाळून टाकली होती.