नागपूर – कोरोना झाल्याने घाबरलेल्या वयोवृद्ध व्यक्तीची रुग्णालयात आत्महत्या

नागपूरमधल्या एका रुग्णालयात कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे. या रुग्णाचं वय 81 वर्ष होतं. कोरोनामुळे हिंमत खचल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. या रुग्णाने आत्महत्येसाठी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या पाईपचा गळफासासाठी वापर केल्याचं सांगण्यात आलं आहे. ‘नागपूर रुग्णालया’च्या स्वच्छतागृहात या रुग्णाने आत्महत्या केली.  सोमवारी मध्यरात्री या रुग्णाने आत्महत्या केली असल्याचा संशय आहे. स्वच्छता कर्मचारी जेव्हा स्वच्छतागृहात गेले तेव्हा त्यांना या रुग्णाचा मृतदेह दिसला होता.

आपली प्रतिक्रिया द्या