नागपूर – शहरात चिनी व्यक्ती आढळून आल्याने भीतीचे वातावरण

1453

कोरोनामुळे आधीच भीती पसरलेली असताना शहरात एक चिनी व्यक्ती आढळून आल्यानंतर एकच गोंधळ उडाला आहे. पोलिसांनी या व्यक्तीला पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या व्यक्तीला मेयो रुग्णालयात दाखल केले. बुधवारी या व्यक्तीचे चाचणी नमुने निगेटिव्ह येताच सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

हुन हुवांग (40) हे या चिन येथून आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. माहितीनुसार, या व्यक्तीचा मसाल्यांचा व्यवसाय आहे. त्या निमित्ताने हा व्यक्ती आॅक्टोबर 2019मध्ये बांगलादेशात येथे गेल्यानंतर येथून डिसेंबर 2019 मध्ये हिंदुस्थानात आले होते. 13 फेब्रुवारी 2020 रोजी ते नागपूरमधून उमरेडला गेले. येथे एका हॉटेलमध्ये थांबले होते. दरम्यान, कोरोना विषाणूची दहशत पसरताच या चिनी व्यक्तीबाबत अनेक जण शंका घेऊ लागले. हॉटेलमालकावर मंगळवारी दबाव वाढल्यानंतर त्यांनी या व्यक्तीला बाहेर काढले. दरम्यान, पोलिसांनाही यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. चिनी व्यक्ती पुढे दिसतायच काहींनी तोंडाला रुमाल तर काहींनी दुप्पटा बांधला. त्याला व्हॅनमध्ये बसविले. त्यांच्या बाजूला कोणीच बसले नाही. नागपूर येथे मेयो रुग्णालयात आणले. चिनी व्यक्तील ने डॉक्टरांना तो करोनापूर्वीच नागपूर येथे असल्याचे सांगितल्यानंतर डॉक्टरांनाही जरा धीर आला. नियमानुसार त्यांचे नमुने घेतल्यानंतर बुधवारी नमुने निगेटिव्ह येताच सर्वांनाच दिलासा मिळाला.

आपली प्रतिक्रिया द्या