सरसंघचालक मोहन भागवत यांना न्यायालयाची नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
महेश उपदेव, नागपूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ  मोहन भागवत यांच्यासह संघ पदाधिकाऱ्यांना नागपूर सत्र न्यायालयाने नोटीस देऊन आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले आहे. संघाच्या प्रशिक्षण शिबीर कार्यक्रमामध्ये स्वयंसेवकांनी हातात दंडुके घेऊन पंथसंचालन केले होते. यामुळे परिसरात संघ दहशत निर्माण करत असल्याची याचिका मोहनीष जबलपुरे यांनी दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करत असताना न्यायालयाने ही नोटीस बाजवली आहे.
राष्ट्रीय सवयंसेवक संघाचा नागपूरमध्ये प्रशिक्षण वर्ग आयोजित केला जातो. यामध्ये देशभरातील स्वयंसेवक सहभागी होतात. प्रशिक्षण वर्गाच्या शेवटच्या दिवशी स्वयंसेवक परिसरात पंथसंचलन करतात. यावेळी स्वयंसेवक दंडुके खांद्यावर घेऊन संचलनात भाग घेतात. मात्र असं करून संघ दहशत पसरवत असल्याचा आरोप याचिकर्त्यांनी केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून या कार्यक्रमासाठी पोलिसांची परवानगी घेण्यात आली होती. त्यामध्ये दंडुके घेऊन पंथसंचालन करता येणार नाही याचा उल्लेख होता. मात्र, कायद्याची पायमल्ली करत संघाने नियमांचे उल्लंघन केले, असा याचिकाकर्त्यांनी आरोप केला आहे.