मोदी हे पाकचे ‘पोस्टरबॉय’, राहुल गांधींचे टीकास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-in-tension

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

‘गायब करणे’ हे केंद्र सरकारचे कामच झाले आहे. ‘गायब हो गया’ ही सरकारची नवी टॅगलाइन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाकिस्तानचे ‘पोस्टरबॉय’ आहेत, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

‘राफेल’ लढाऊ विमान खरेदी करारातील फाइल्स चोरीला गेल्याची माहिती बुधवारी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली. यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले, आता सरकारची नवीन टॅगलाइन आली आहे, ‘गायब हो गया’. दोन कोटी तरुणांचा  रोजगार गायब झाला, शेतकऱ्यांना मिळणारा योग्य भाव गायब झाला, खात्यात जमा होणारे 15 लाख गायब झाले, शेतकऱ्यांच्या विम्याचे पैसे गायब झाले, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे व्यवसाय गायब झाला, डोकलाम गायब झाले आणि आता ‘राफेल’च्या फाइल्सही गायब झाल्या असे राहुल गांधी यांनी सांगितले.