नाशिकमध्ये पक्ष्यांचा किलबिलाट वाढला, ‘चला पक्षी बघूया’ उपक्रमांतर्गत नोंदी

पक्षी सप्ताहानिमित्त नेचर क्लब ऑफ नाशिकतर्फे पक्षिमित्रांनी महिनाभर ‘चला पक्षी बघूया’ उपक्रमांतर्गत नोंदी घेतल्या. त्यानुसार कोरोना काळात शहरात पक्ष्यांचा किलबिलाट वाढला आहे. प्रामुख्याने घार, चिमण्या, कबुतर, पोंड हेरॉन, नाईट हेरॉन व मलबारी मैना मोठय़ा संख्येने नजरेस पडत आहेत.

गेला महिनाभर संस्थेचे कार्यकर्ते शहरात पक्षीगणना करीत होते. त्याचा समारोप गोदापार्क येथे करण्यात आला. शहरातील पक्ष्यांची संख्या, त्यांची घरटी, जलप्रदूषण आदींचा अभ्यास करून निरीक्षणे नोंदवण्यात आली.

गंगापूर रोड, गोदापार्प, तपोवन, गंगापूर धरण, जुने नाशिक, पांडवलेणी परिसरात पक्ष्यांच्या नोंदी घेण्यात आल्या. रुंगठा हायस्पूल, अभिनव विद्यामंदिर, सारडा विद्यालयाजवळ चिमण्यांचा चिवचिवाट ऐकण्यास मिळाला. या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, रवींद्र वामनाचार्य, किशोर वडनेरे, डॉ. जयंत फुलकर, सागर बनकर, अपूर्व नेरकर, मेहुल थोरात, हितेश पटेल, दर्शन घुगे, रिद्धी येवला, आकाश जाधव आदी सहभागी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या