गरीब-बिचारे पुरुष… NSSOच्या अहवालानुसार पुरुष कामगारांची संख्या घटली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस (NSSO) ने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये 2014 नंतर पुरुष कामगारांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे सांगण्यात आले आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने या अहवालाचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. 2017-18 मध्ये NSSO ने केलेल्या सर्वेक्षणात 1993-94 नंतर 2017-18 मध्ये पुरुष कामगारांच्या संख्येत 28.6 कोटींची घट झाल्याचा खुलासा करण्यात आला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रात याबद्दल माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, 1993-94 मध्ये हा आकडा 21.9 कोटी होता. तर 2011-12 मध्ये 30.4 कोटी. यावरून गेल्या काही वर्षांत देशात रोजगाराच्या संधी फारच कमी निर्माण झाल्या हे स्पष्ट होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या वृत्तात म्हटल्यानुसार सरकारने हा अहवाल सार्वजनिक करण्यास मनाई केल्याचे आहे. आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने हा अहवाल रोखल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे सरकारच्या या भूमिकेवर नाराज झाल्याने NSSOचे कार्यवाहक पी सी मोहनन आणि जे वी मीनाक्षी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या अहवालात शहराबरोबरच ग्रामीण भागात बेरोजगार झालेल्यांचा डाटा देखील देण्यात आला आहे. त्यानुसार शहरात बेरोजगारीचा आकडा 7.1 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर ग्रामीण भागात हा आकडा 5.8 टक्के एवढा आहे. यावरून तरुणांना रोजगाराच्या संधीच उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

NSSOने दिलेल्या आकडेवारीनुसार 2011-12 पासून 2017-18 पर्यंत देशात ग्रामीण भागात 4.3 कोटी नोकऱ्यांची कमतरता निर्माण झाली. तर दुसरीकडे शहरी भागात 40 लाख नोकऱ्या कमी झाल्या. परिणामी शहरात काम करणारे पुरुष मोठ्या प्रमाणावर बेकार झाले. तर ग्रामीण भागात महिला कामगारांना रोजगारच नसल्याने 68 टक्के महिला बेरोजगार झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर शहरात काम करणाऱ्याा पुरुषांच्या रोजगारात 96 टक्कयांची घट झाली.
तंत्रज्ञानाच्या क्षेत्राशी निगडीत असलेल्या तरुणांची संख्या मात्र यात अल्प आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.