
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी 21 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती योजना परीक्षेची निवड यादी व गुण यादी आज राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर जाहीर झाली.
परीक्षेसाठी 1 लाख 97 हजार 170 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील 11 हजार 682 विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती कोटा निश्चित करण्यात आला. सध्या परीक्षेचा निकाल व निवड यादी परीक्षेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली असून विद्यार्थ्यांचे गुणपत्र शाळा लॉगीनवर देण्यात येणार आहे, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी स्पष्ट केले.
























































