ट्वीशा शर्मा मृत्यूप्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे, प्रकरणाचे गूढ उकलणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भोपाळमधील ट्वीशा शर्मा प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. ट्वीशा शर्मा मृत्यूप्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. गृह विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार सीबीआय ट्वीशाच्या मृत्यूचे गूढ उकलणार आहे. ट्वीशाच्या वडिलांनी याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. तसेच पोलीस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ट्वीशाच्या भावाने केला होता.

भोपाळच्या कटारा हिल्स येथील राहत्या घरी 12 मे 2026 रोजी ट्विशाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. कटारा हिल्स पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 80(2), 85, 3(5) आणि हुंडा प्रतिबंधक कायदा, 1961 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य सरकारने दिल्ली विशेष पोलीस स्थापना कायदा, 1946 च्या कलम 6 अंतर्गत संपूर्ण मध्य प्रदेशात सीबीआयला तपास अधिकार देण्यास सहमती दर्शवली आहे.

दरम्यान, ट्वीशाचा पती आरोपी समर्थ सिंग अद्याप फरार आहे. तर सासू निवृत्त न्यायाधीश गिरीबाला सिंह हिला जामीन मंजूर करण्यात आला आहे. समर्थविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली असून, त्याच्या बँक खात्यांची आणि पासपोर्टची चौकशी सुरू आहे, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले.