
तामीळनाडूत सत्ताधारी पक्ष टीव्हीकेच्या एका पदाधिकाऱ्याची भररस्त्यात हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. कन्नन असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. हल्लेखोर बाईकवरून आले. त्यांनी कन्नन यांचा पाठलाग केला आणि धारदार शस्त्राने हल्ला करून पळून गेले. या हल्ल्यात कन्नन यांचा जागीच मृत्यू झाला. 5 आरोपींना अटक केली आहे.

























































