अतिआत्मविश्वास असलेली भाजप नेमकी कशाला घाबरलीय? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना आयकर विभागाने काँग्रेसशी संबंधित बँक खाती गोठवली आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी आणि वीज बिल भरण्यासाठीही पैसे नसल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात येत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर टीका करत त्यांना टोला लगावला आहे. ”चारशे पारचा दावा करणारी भाजप नेमकी कशाला घाबरली आहे? असा सवाल आव्हाड यांनी केला आहे.

”400 पार’चा (अति) आत्मविश्वास असणारी भाजप नेमकी कशाला घाबरली आहे समजत नाही. काल ‘इलेक्टोरल बाँड’ घटनाबाह्य असल्याचा निर्णय आल्यानंतर आज काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठावण्याचे आदेश इन्कम टॅक्स विभागाने दिले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला अडचणीत आणण्याच्या भाजपाच्या या प्रयत्नावरून “ते घाबरले” असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी आज पत्रकार परिषद घेत आयकर विभागाने काँग्रेसची सर्व खाती गोठवल्याचे सांगितले आहे. काँग्रेससह युवक काँग्रेसचीही खाती गोठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली