
महाविकास आघाडीचे निवडून आलेले आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला मात्र ते शक्य झाले नाही म्हणून ईडी, इन्कम टॅक्सची धाड टाकली जात आहे. ईडी काय महाराष्ट्रातच आहे का? भाजपचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का? असा रोखठोक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. रायगड जिल्ह्यातील उरण येथे ते बोलत होते.
धाडसत्रांना घाबरत नाही म्हणून काही लोक आणखी अस्वस्थ झाले आणि त्यांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेकीचा हल्ला घडवून आणला. शरद पवार नेहमीच एसटी कामगारांसाठी लढले, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले मात्र काहींनी एसटी कामगारांना भडकावण्याचा प्रयत्न केला. आझाद मैदानात चिथावणीखोर भाषणे दिली. त्यातून हे घडले असेही जयंत पाटील म्हणाले.
…तर तुम्हाला सत्तेतून हटवू! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधान मोदींना खूलं आव्हान
आता सध्या अटक झालेल्या लोकांची चौकशी सुरू आहे. ‘दूध का दूध पानी का पानी’ होणारच पण यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणीही जयंत पाटील यांनी यावेळी केली. फुले – शाहू – आंबेडकर यांच्या विचारांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालतो. जातीयवादी पक्षांना राष्ट्रवादीच उत्तर देऊ शकते हे लोकांना आता पटले आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
वीजेच्या प्रश्नावरून जयंत पाटलांकडून भाजप सरकार लक्ष्य, ते धाडस भाजप सरकारने दाखवले नाही






























































