नेटफ्लिक्स 3 महिन्यांत मिळवले 93 लाख नवे युजर्स

 

नेटफ्लिक्सने या वर्षीच्या पहिल्या तिमाहीचा आर्थिक अहवाल जाहीर केला. यानुसार कंपनीने 2024 च्या पहिल्या तिमाहीत 93.3 लाख नवे युजर्स जोडण्यात यश मिळवले आहे. 2024 च्या सुरुवातीलाच नेटफ्लिक्सच्या सशुल्क युजर्सच्या संख्येने 25 कोटींचा टप्पा पार केला. गेल्या वर्षीपेक्षा पहिल्या तिमाहीत सशुल्क युजर्समध्ये विक्रमी वाढ झाल्याची नोंद अहवालात आहे. जगभरातील हे युजर्स आहेत. विशेष म्हणजे  अमेरिका आणि कॅनडाचे युजर्स सर्वाधिक आहेत.