
सामना प्रतिनिध । मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवा सेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. युवासेना विस्तारकपदी राजेश पळसकर, नीलेस बडदे यांची नियुक्ती केली आहे. युवासेना सहसचिवपदी नीलेश गवळी, जान्हवी जाधव यांची तर मुंबई समन्वयकपदी अमरनाथ (बाबू) गुप्ता यांची नियुक्ती केल्याचे युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

























































