मृण्मयीचा देशपांडे नवा लूक पाहिलात का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

सध्या मृण्मयी देशपांडेचा हटके लूक असणारा फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे. यात मृण्मयी शॉर्ट हेअरकटमध्ये दिसत आहे. अनेकदा सोज्वळ भूमिकांमध्ये दिसणाऱया मृण्मयीचा हा नवा लूक नेमका कशासाठी आहे, हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. असे असले तरी मृण्मयी मात्र या नव्या हेअरकटमध्ये खूपच आकर्षक दिसत आहे. तिचा हा नवा लूक चाहत्यांना निश्चितच घायाळ करणारा आहे. मृण्मयीने नेहमीच आपल्या सालस सौंदर्यानं आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. त्यामुळे या नव्या हेअरस्टाईलमधून मृण्मयी एका वेगळया भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे का? हे येत्या काळातच प्रेक्षकांना कळेल. तोपर्यंत मात्र प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागेल, हे नक्की!

mrunmayee-1