
जेएनयूचे कुलगुरू एम. जगदीश कुमार यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. प्रा. डी. पी. सिंग यांनी वयाच्या 65 व्या वर्षी यूजीसी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर 7 डिसेंबरपासून हे पद रिक्त होते. या पदावर एम. जगदीश कुमार यांची निवड झाली आहे. ते मूळचे तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यातील आहेत. जगदीश कुमार यांचा जेएनयूमधील कार्यकाल विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरला होता.























































