कोरोनाचा कहर! न्यूझीलंडमध्ये हिंदुस्थानातून येणाऱ्यांवर बंदी

हिंदुस्थानात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. दररोज देशात एक लाखाहून अधिक कोरोनाग्रस्त आढळत आहे. देशातील कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा जास्त भयंकर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे न्यूझीलंडने हिंदुस्थानातून येणाऱ्यांवर बंदी घातली आहे.

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा अर्डेन यांनी आज या बंदीची घोषणा केली. ”11 एप्रिलपासून ते 28 एप्रिलपर्यंत हिंदुस्थानातून न्यूझीलंडमध्ये येण्यास बंदी असणार आहे. हा नियम न्यूझीलंडच्या नागरिकांना देखील लागू आहे जे सध्या हिंदुस्थानात आहेत”, असे जॅकिंडा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

न्यूझीलंडमध्ये मंगळवारी आढळून आलेल्या 23 कोरोनाग्रस्तांपैकी 17 कोरोनाग्रस्त हे हिंदुस्थानी असल्याचे आढळून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या