नीरव मोदी ब्रिटनमध्येच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

पंजाब नॅशनल बँकेची (पीएनबी) 13 हजार कोटींहून जास्त फसवणूक करून परदेशी पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदी हा ब्रिटनमध्येच असल्याची माहिती ब्रिटन सरकारने हिंदुस्थान सरकारला दिली आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र राज्यंमत्री व्ही. के. सिंग यांनी शुक्रवारी राज्यसभेत ही माहिती दिली. ऑगस्टमध्ये ‘सीबीआय’ आणि ‘ईडी’ने केलेल्या विनंतीनंतर नीरव मोदी हा ब्रिटनमध्येच असल्याची माहिती मॅनचेस्टरच्या राष्ट्रीय केंद्रीय विभागाने दिल्याचे, सिंग यांनी सांगितले. पळालेल्या नीरव मोदीचा ठावठिकाणा सांगण्याची विनंती हिंदुस्थान सरकारने युरोपियन देशांना केली होती.