नीरव मोदी लवकरच हिंदुस्थानच्या ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून लंडनमध्ये लपून बसलेला फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला आता हिंदुस्थानात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हिंदुस्थानात प्रत्यार्पण केले जाऊ नये यासाठी मोदी याने लंडन उच्च न्यायालयात केलेला अर्ज न्यायालयाने आज फेटाळून लावला. त्याचबरोबर त्याला सर्वोच्च न्यायालयातही दाद मागता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. लंडन उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत नीरव मोदीने आपले मानसिक आरोग्य ठीक नसल्यामुळे हिंदुस्थानच्या ताब्यात देऊ नये, अशी याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान, न्यायाधीशांनी नीरव मोदीचा दावा फेटाळून लावला.