आधारकार्ड नाही म्हणून रेशन नाकारणे चुकीचेच, केंद्र सरकारनेही बजावले

318

केवळ आधारकार्ड नाही म्हणून कोणत्याही नागरिकाला रेशन देणे नाकारले जाता कामा नये अशी तंबी सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व राज्यांना सोमवारीच दिलेली असताना केंद्रानेही तेच मत व्यक्त केले आहे. आधारकार्ड नसेल तर रेशन नाकारणे हे साफ चुकीचे आहे असे केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी मंगळवारी म्हटले आहे.

रेशनच्या दुकानांमध्ये यापूर्वी आधारकार्डचा आधार घेऊनच नागरिकांना रेशन दिले जात होते, पण ते ठीक नसल्याचेही केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी लोकसभेत स्पष्ट केले. जर एखाद्या व्यक्तीजवळ आधारकार्ड नसेल तर त्याला रेशन नाकारण्यापेक्षा त्याच्याकडील इतर ओळखपत्रांची दखल घेत त्याला किमान रेशन तरी द्यायलाच हवे. त्यासाठी आवश्यक असलेली ईपीओएस मशीन्स देशातील 5 लाख 35 हजार रेशन दुकानांपैकी 4 लाख 58 हजार रेशन दुकानांमध्ये उपलब्ध आहेत, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या