माढा लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । माढा

माढा लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर करण्यात आली असून तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया गुरुवार दि 28 मार्च पासून सुरू होत असून त्याची अधिसूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काढली.

तिसऱ्या टप्प्यातील सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन भरण्याची प्रक्रिया 28 मार्च पासून सुरु होत असून अंतिम तारीख 4 एप्रिल आहे नामनिर्देशन छाननी 5 एप्रिल रोजी होणार असून ,उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत 8 एप्रिल असणार आहे.

माढा मतदार संघात करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस, फलटण, माण या विधानसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आला आहे तर एकूण मतदार 18,90,547 असून त्या मध्ये पुरुष 990304, स्त्री 89,59,97 इतके मतदार नोंद झाली आहे तर माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2002 मतदान केंद्र अपेक्षित आहे.