शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानिमित्त विविध उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेनेच्यावतीने मुंबईसह राज्यभरात भव्य रक्तदान शिबीर, रुग्णांना फळेवाटप, बच्चे कंपनीला खाऊ वाटप, विविध विकासकामांचे लोकार्पण, क्रीडा स्पर्धा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे उपाध्यक्ष प्रदीप बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही. एन. देसाई रुग्णालयातील रुग्णांना अदाणी इलेक्ट्रिसिटी विद्युत कामगार सेनेतर्फे फळवाटप करण्यात आले. यावेळी अदाणी इलेक्ट्रिसिटी विद्युत कामगार सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेना शाखा क्रमांक 125 रमाबाई नगर, घाटकोपर (पूर्व) येथे आयुर्विद्या प्रसारक मंडळ, शीव यांच्या सहकार्याने आरोग्य शिबीर आयोजित केले होते. उपस्थित सर्व वैद्यकीय डॉक्टरांचे उपविभप्रमुख संजय (बाबू) दरेकर, विधानसभा समन्वयक सुरेश आवळे यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन शाखाप्रमुख मयूरेश नामदास यांनी केले. सदर कार्यक्रमास विधानसभा समन्वयक सुरेखा घुगे, शाखा संघटिका नंदिनी परब, कार्यालय प्रमुख राजेंद्र मोहिते, प्रीतम शिर्के, युवासेनेचे रचना सावंत, लक्की सोहेल उपस्थित होते.

वॉच डॉग फाऊंडेशनतर्फे अंधेरी पूर्व लीला पेंटा सिग्नल येथील  मी मुंबईकर चौकात स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत फाऊंडेशनचे संस्थापक निकोलस अल्मेडा, गोडफ्रे पिमेंटा, महिला अध्यक्ष सिंथ्य गोन्सलवीस आदींनी सहभाग घेतला होता.

विभागप्रमुख आमदार ऍड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना शाखा क्र. 87 आणि मुंबईचे माजी महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या वतीने व्ही.एन. देसाई रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. या वेळी विधानसभा समन्वयक अनिल त्रिंबककर, माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर, शाखाप्रमुख संतोष गुप्ता, शाखा संघटक अंजली जाधव, मुंबई समन्वयक डॉ. प्रांजल महाडेश्वर, उपशाखाप्रमुख विनोद बवले, अनंत शिरवाडकर, सुनील सावंत, सतीश सोनावणे, अभय सिंह, झाकीर कुरेशी, नलिनी पार्सेकर, प्रियंका शिंदे, लीलावती कातकर, रंजना पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

स्थानीय लोकाधिकार समिती आणि भारतीय कामगार सेना, टाटा रुग्णालय युनिटच्यावतीने कर्करुग्णांना फळेवाटप तसेच रुग्णालयातील चोक्सी सभागृहात मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई, संघटक दिनेश बोभाटे, आमदार अजय चौधरी, टाटा स्मारक केंद्राचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अनिल साठे आदी उपस्थित होते. स्थानीय लोकाधिकार समिती आणि भारतीय कामगार सेना युनिटचे अध्यक्ष तुकाराम गवळी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय कामगार युनिटचे सरचिटणीस राहुल सावंत, नंदकिशोर कासकर, कार्याध्यक्ष ललित फोंडेकर, उपाध्यक्ष जगदीश सोळंकी, सदानंद चव्हाण, नितीन गवळी आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावला.