
पोलीस कर्मचाऱयाने केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेले ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा किशोर दास यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे ओडिशात खळबळ उडाली आहे.
आरोग्य मंत्री नाबा दास हे आज सकाळी झारसुगुडा जिह्यातील बृजराजनगरजवळ एका कार्यक्रमासाठी गेले होते. तेव्हा ते कारमधून उतरल्यानंतर त्यांच्यावर एका पोलीस कर्मचाऱयाने गोळय़ा झाडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान पोलीस कर्मचाऱयाने का गोळीबार केला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. नाबा दास यांच्या मृत्यूनंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी शोक व्यक्त केला आहे. दास यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. पक्ष तसेच सरकारमध्ये त्याचे खूप महत्त्व होते. त्यांच्या निधनामुळे ओडिशा राज्याचे मोठे नुकसान झाले आहे, अशा भावना पटनाईक यांनी व्यक्त केल्या आहेत.






















































