
इंटरनेट आणि माहिती व तंत्रज्ञानाच्या जमान्यामध्ये घरबसल्या वस्तुंची खरेदी आणि विक्री करता येत असल्याने वेळ आणि श्रमही वाचतात. मात्र यात अनेकदा नागरिकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. OLX या जुन्या-नव्या वस्तुंची खरेदी-विक्री होणाऱ्या ऑनलाईन साईटवरूनही अनेकांची फसवणूक होत असते. त्यामुळे नवी मुंबई पोलिस आयुक्तलयाकडुन सर्व नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी नागरिकांना काही महत्त्वाच्या सुचनाही दिल्या आहेत.
फसवणुकीपासून वाचा –
– फसवणूक करणारे व्यक्ती ग्राहकांना तुमची वस्तू कुरीअरने पाठत आहोत असे सांगतात. मात्र बऱ्याचदा ती वस्तू कुरीअर कंपनीतून ट्रक किंवा वाहतुकीच्या साधनामध्ये लोड केल्याचे खोटे फोटो टाकून सुरुवातीपासूनच विश्वास संपादन करतात, तसचे कुरीअरची खोटी पावती आपल्याला व्हॉट्सअॅपवर पाठवतात.
– तुम्ही OLX bj मोटारसायकल किंवा कार विक्रीची जाहिरात केली असेल तर ठग तुम्हाला टेस्ट ड्राईव्हच्या नावाने निर्जन ठिकाणी घेऊन जाऊन वाहून पळवून नेऊ शकतो.
– फसवणूक करणारा इसम OLX वर वस्तू खरेदीसाठी ई-वॉलेट किंवा युपीआर, पे टीएम यासराख्या ई-वॉलेट ने पेमेंट होत नाही असे सांगून रिक्वेस्ट मनीची लिंक पाठवून युपीआर पिन टाका म्हणजे पैसे तुमच्या कात्यात येतील असे सांगतात, परंतु रिक्वेस्ट मनी लिंकशी जोडल्या गेल्याने तुमच्या खात्यातील पेसे त्याच्या खात्यात आपोआप वळवले जातात.
– नेहमी विश्वसनीय वेबसाईटवरूनच खरेदी करा. वेबसाईटची विश्वसनियता जाणून घेण्यासाठी त्या वेबसाईटचे पब्लिक रिव्हीव्ह तपासणे आवश्यक आहेत, तसेच त्या वेबसाईटवर https:// असेल त्याच वेबसाईटवरून शक्यतो खरेदी विक्री करावी.
– OLX किंवा तत्सम वेबसाईटवरून खरेदी करताना सार्वजनिक ठिकाणी भेटून वस्तुची व व्यवहार करणाऱ्या व्यक्तीची पडताळणी करूनच पैसे घ्या किंवा द्या.
– OLX वर वस्तू खरेदीसाठी ई-वॉलेट किंवा युपीआर, पे टीएम यासारख्या ई-वॉलेटवर पे किंवा सेंड मनी यासारख्या पर्यायांवर क्लिक करू नका.
– जर विक्रेत्याने साहित्य पाठवले असे सांगून कुरीअर स्लिप पाठवली तर त्या स्लिपची पडताळणी करून घ्या. नमूद असलेल्या फोन नंबरवर फोन करून कंपनी अस्तित्वात असल्याची खात्री करा.
– OLX किंवा तत्सम वेबसाईटवरून खरेदी करताना व्हॉट्सअॅप चॅटवर पाठवलेले आयडी प्रुफ किंवा मेसेज यावर विश्वास ठेऊन ऑनलाईन पैसे भरू नका.
– नामांकीत आणि विश्वसनीक कंपनीच्या वस्तू कधीही कमी किंमतीत विकल्या जाऊ शकत नाहीत. जो व्यक्ती अशा वस्तू कमी किंमतीत विकत असेल त्याचा उद्देस हा फसवणुकीचाच असतो.
नवी मुंबई पोलिस आयुक्तलयाकडुन सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, OLX या ऑनलाईन साईट वरून लोकांची फसवणूक होत असते. त्यासाठी नागरिकांना महत्वपूर्ण सुचना #Cyber_Safety #Navimumbai_Police #Cyber_Awareness #Cyber_Security_Awareness @OLX_India pic.twitter.com/YPSetmAnFS
— Navi Mumbai Police (@Navimumpolice) November 25, 2019

























































