
मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या वतीने 2022-2023 या शैक्षणिक वर्षाच्या पत्रकारितेच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चौकशी फॉर्म संस्थेच्या संकेतस्थळावर इन्क्वायरी नाऊ या सदराखाली उपलब्ध आहेत. या कोर्सची माहिती हवी असल्यास या लिंकवर अर्धवेळ या सदराखाली पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मीडिया मॅनेजमेंट मराठी या अभ्यासक्रमासाठी फॉर्म भरावा. या अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी शनिवार, 11 जूनला सकाळी 11 वाजता ऑनलाइन सत्र होणार आहे.


























































